Kukutpalan Yojana 2026 या योजनेबद्दल आपण या पोस्ट मध्ये अर्ज कसा करायचा यासाठी डॉक्युमेंट्स काय काय लागतील तसंच या योजनेबद्दलच्या तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे या पोस्ट मध्ये तुम्हाला मिळतील.
आपल्या गावात गावरान कोंबड्या पाळणारे खूप जण असतात. काही जण शंभर-दोनशे कोंबड्यांपासून सुरुवात करतात आणि हळूहळू व्यवसाय वाढवतात. पण एक गोष्ट नेहमी आडवी येते सुरुवातीला लागणारा मोठा खर्च. शेड बांधायला पैसे नाहीत, पक्षी विकत घ्यायला भांडवल नाही. मग अशा वेळेस काय करायच हा प्रश्न उभा राहतो.
पण आता हे चित्र बदलणार आहे.
महाराष्ट्र शासनाने मार्च 2026 मध्ये एक महत्त्वाचा शासन निर्णय जाहीर केला आहे. मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेअंतर्गत Kukutpalan Yojana 2026 साठी थेट 50 ते 75 टक्क्यांपर्यंत अनुदान मिळणार आहे. म्हणजे तुम्ही अर्धा खर्च करा, नंतर त्यावर सरकार तुम्हाला अनुदान देणार. आणि विशेष म्हणजे SC-ST प्रवर्गाला तर 75 टक्क्यांपर्यंत मदत मिळते.
या योजनेत नक्की काय आहे, कोणाला मिळते, किती पैसे मिळतात आणि अर्ज कसा करायचा हे सगळं आज आपण सविस्तर बघणार आहोत.
आपल्याला व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम, टेलिग्राम, फेसबूक आणि यूट्यूबवर अजूनपर्यंत Follow आणि Subscribe केल नसेल तर लगेच करून घ्या योजनेच्या लेटेस्ट अपडेटच्या व्हिडिओसाठी.
Kukutpalan Yojana 2026 म्हणजे काय?
महाराष्ट्र शासनाचं “विकसित महाराष्ट्र 2047” हे एक मोठं स्वप्न आहे. राज्याची अर्थव्यवस्था 5 ट्रिलियन डॉलरपर्यंत न्यायची आहे. हे साध्य करायचं असेल तर फक्त शहरं नाही, ग्रामीण भागही मजबूत व्हायला हवा. आणि ग्रामीण भागात शेतीला जोड म्हणून पशुपालन हाच सर्वात विश्वासार्ह पर्याय आहे.
याच विचारातून कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाने दिनांक 09 मार्च 2026 रोजी शासन निर्णय क्रमांक DAHD-14017/1/2026-AH4 जारी केला. मंत्रिमंडळाने 22 फेब्रुवारी 2026 रोजी मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता या योजनेला मंजुरी दिली होती.
या योजनेअंतर्गत कुक्कुटपालनासाठी अनुदान तीन वेगळ्या घटकांना मिळते. प्रत्येक घटक वेगळ्या गरजेसाठी आणि वेगळ्या लाभार्थ्यांसाठी तयार केलेली आहे.
Kukutpalan Yojana 2026 मधील तीन घटक कोणते?
1. 5000 अंडी देणाऱ्या कुक्कुट पक्षांचे वाटप
ही योजना त्यांच्यासाठी आहे जे अंडी उत्पादनाचा मोठा व्यवसाय सुरू करायला इच्छुक आहेत.
या योजनेत वार्षिक किमान 200 अंडी उत्पादन देणारे 5000 एक दिवशीय पक्षी मिळतात. यासोबत एक महिन्याचा खाद्यावरील खर्च, अर्धबंदिस्त किंवा पिंजरा पद्धतीने शेड बांधकाम, खाद्य-पाणी भांडी, एग नेस्ट, ऑटोमेशन प्रणाली आणि 3 kW सोलर यंत्रणा असा संपूर्ण प्रकल्प उभारण्यासाठी मदत मिळते.
प्रकल्पाची एकूण किंमत 30,00,000 रुपये आहे.
यात 5000 पक्षी प्रति पक्षी 50 रुपये याप्रमाणे 2,50,000 रुपये, एक महिन्याचा खाद्य खर्च 4,50,000 रुपये, शेड बांधकाम 15,00,000 रुपयांपर्यंत, आवश्यक साधनसामुग्री 6,68,000 रुपये आणि सोलर यंत्रणेसाठी 1,02,000 रुपये असा हिशोब आहे.
अनुदान किती मिळतं?
सर्वसाधारण प्रवर्गासाठी 50 टक्के म्हणजे 15,00,000 रुपये आणि अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गासाठी 75 टक्के म्हणजे 22,50,000 रुपये अनुदान मिळतं. हे अनुदान थेट बँक खात्यात DBT पद्धतीने जमा होतं ते पण दोन टप्प्यांत. पहिला टप्पा शेड बांधकाम झाल्यावर आणि दुसरा टप्पा पक्षी व साधनसामुग्री खरेदी केल्यावर मिळतो.
2. मांसल कुक्कुट 3000 ते 5000 पक्षांच्या संगोपनाद्वारे उद्योजकता विकास
ब्रॉयलर म्हणजे मांसासाठी कोंबड्या पाळायच्या असतील तर ही योजना तुमच्यासाठी आहे. यामध्ये तुम्ही गावरण कोंबड्या देखील मासासाठी पाळू शकता. या योजनेत शेड बांधकाम, सोलर यंत्रणा आणि खाद्य-पाणी भांडी यासाठी अनुदान मिळतं. पक्षी खरेदी लाभार्थ्याने स्वतः करायची असते सुधारित पक्षी खुल्या बाजारातून घेता येतात.
प्रकल्प खर्च आणि अनुदान
3000 पक्षांचा एकूण प्रकल्प खर्च 12,00,000 रुपये आहे तर 5000 पक्षांसाठी 19,00,000 रुपये आहे.
सर्वसाधारण प्रवर्गासाठी 50 टक्के अनुदान 3000 पक्षांसाठी 6,00,000 रुपये आणि 5000 पक्षांसाठी 9,50,000 रुपये. अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गासाठी 75 टक्के — 3000 पक्षांसाठी 9,00,000 रुपये आणि 5000 पक्षांसाठी 14,25,000 रुपये.
हे अनुदानही दोन टप्प्यांत मिळतं शेड बांधकाम झाल्यावर पहिला टप्पा आणि पक्षी व साधनसामुग्री खरेदी केल्यावर दुसरा टप्पा मिळतो.
3. 1000 अंडी उबवणी क्षमतेचे संयंत्र वाटप (Incubator-Hatcher)
या तीन योजनांमधली ही सर्वात वेगळी योजना आहे. इथे पक्षी नाही मिळत तर अंडी उबवायचं यंत्र मिळतं. ज्यांना poulry incubation चा व्यवसाय करायचा आहे त्यांच्यासाठी ही एक चांगली संधी आहे.
प्रति आठवडा 1000 अंडी उबवणी क्षमतेचे Incubator आणि Hatcher संयंत्र आणि यासोबत 3 kW सोलर यंत्रणा मिळते.
प्रकल्प खर्च एकूण 3,10,000 रुपये आहे. यात संयंत्राची किंमत 2,08,000 रुपये आणि सोलरसाठी 1,02,000 रुपये आहे.
सर्वसाधारण प्रवर्गासाठी 50 टक्के म्हणजे 1,70,000 रुपये आणि अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गासाठी 75 टक्के म्हणजे 2,55,000 रुपये अनुदान मिळतं.
या योजनेत एक महत्त्वाचं वेगळेपण आहे जमीन नसलेल्या म्हणजे भूमिहीन लाभार्थ्यांनाही अर्ज करता येतो.
Kukutpalan Yojana 2026 साठी पात्रता काय आहे?
जमीन
अंडी देणारे पक्षी आणि मांसल कुक्कुटपालन या दोन्ही योजनांसाठी किमान 20 गुंठे स्वतःची जमीन किंवा 5 वर्षांचा नोंदणीकृत भाडेपट्टा असणं आवश्यक आहे. निहक्क धारकांना जमिनीची अट लागू नाही. Incubator योजनेत मात्र जमिनीची कोणतीही अट नाही.
अनुभव किंवा प्रशिक्षण
तिन्ही योजनांसाठी कुक्कुटपालन व्यवसायाचा किमान 2 वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. अनुभव नसेल तर शासकीय किंवा निमशासकीय संस्थेचं प्रशिक्षण प्रमाणपत्र चालतं. अर्ज करताना प्रमाणपत्र नसेल तरी काळजी करायची गरज नाही अनुदान घेण्यापूर्वी प्रशिक्षण घेण्याचं हमीपत्र देऊन चालतं.
लाभार्थी प्राधान्यक्रम
अंडी देणारे आणि मांसल कुक्कुट योजनांसाठी सर्वात आधी अत्यल्प भूधारक म्हणजे 1 हेक्टरपर्यंत जमीन असणाऱ्यांना संधी मिळते. त्यानंतर अल्प भूधारक, मग निहक्क धारक, नंतर सुशिक्षित बेरोजगार आणि शेवटी महिला बचत गटातील लाभार्थी.
Incubator योजनेसाठी मात्र सर्वात आधी भूमिहीनांना प्राधान्य आहे नंतर अत्यल्प भूधारक, अल्प भूधारक, सुशिक्षित बेरोजगार आणि महिला बचत गट.
तिन्ही योजनांमध्ये दिव्यांगांसाठी 5 टक्के आणि महिलांसाठी 50 टक्के आरक्षण आहे. ही योजना मुंबई आणि मुंबई उपनगर वगळता महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांत लागू आहे. एका कुटुंबातून फक्त एकालाच लाभ मिळेल.
Kukutpalan Yojana 2026 कोणती कागदपत्रे लागतात?
कागदपत्रांची यादी फार मोठी नाही.
7/12 उतारा किंवा 5 वर्षांचा नोंदणीकृत भाडेपट्टा करारनामा लागतो. निहक्क धारकांसाठी अनुसूची प्रमाणपत्र किंवा 7/12 उताऱ्यावरील “इतर अधिकार” नोंद आवश्यक आहे.
कुक्कुटपालन अनुभव प्रमाणपत्र किंवा प्रशिक्षण प्रमाणपत्र द्यावं लागतं.
अंडी देणारे व मांसल कुक्कुट योजनांसाठी बँक कर्ज मंजुरीचं सहमती पत्रही लागतं.
दिव्यांग असाल तर UDID प्रमाणपत्र आणि बचत गटाचे सदस्य असाल तर सदस्यत्व प्रमाणपत्र द्यावं लागतं.
आणि यात तुमचे बेसिक KYC डॉक्युमेंट्स लागतील.
महत्त्वाच्या अटी अर्ज करण्यापूर्वी एकदा नक्की वाचा
पक्षी खरेदी करताना प्रथम शासकीय मध्यवर्ती अंडी उबवणी केंद्र, सघन कुक्कुट गट किंवा राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत स्थापित कुक्कुट प्रकल्पातून खरेदी करणं अपेक्षित आहे. सुधारित म्हणजेच बॉयलर पक्षी मात्र खुल्या बाजारातूनही घेता येतात.
निवड झाल्यानंतर दोन महिन्यांत शेड उभारणी पूर्ण करायची आहे. त्यानंतर एका महिन्यात पक्षी खरेदी आणि प्रत्यक्ष कुक्कुटपालन सुरू करणं आवश्यक आहे. Incubator योजनेत एक महिन्यात संयंत्र बसवणं आणि पुढच्या एका महिन्यात अंडी उबवणी सुरू करणं आवश्यक आहे.
वेळेत काम नाही केलं तर प्रतीक्षा यादीत शेवटी नाव जातं. आणि जर मागील 3 वर्षांत केंद्र किंवा राज्याच्या अशाच एखाद्या योजनेचा लाभ घेतला असेल तर या योजनेसाठी अपात्र ठरण्याची शक्यता आहे.
Kukutpalan Yojana 2026 अर्ज कसा करायचा?
Kukutpalan Yojana 2026 योजनेसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. आयुक्त पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय, महाराष्ट्र राज्य, पुणे हे दरवर्षी आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला ऑनलाईन अर्ज मागवतात. सर्व अर्जांची छाननी होऊन यादृच्छिक पद्धतीने म्हणजे Random Lottery पद्धतीने निवड केली जाते.
मांसल कुक्कुट आणि अंडी देणाऱ्या 5000 पक्षी योजनांसाठीची अंतिम निवड राज्यस्तरीय समितीमार्फत होते. निवड झालेल्या लाभार्थ्यांची यादी आयुक्त पशुसंवर्धन यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाते.
सध्या अर्जाची नक्की तारीख अजून जाहीर नसेल तर आपल्या जिल्ह्यातील जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालयात जाऊन चौकशी करणं हा सर्वात सोपा मार्ग आहे. पण शक्यतो एप्रिल २०२६ मध्ये अर्ज सुरू होण्याची शक्यता आहे.
Yojnavala टीम कडून मार्गदर्शन मिळवा.
“खाली दिलेला Google फॉर्म भरा – आमची टीम 24 ते 48 तासांत तुमच्याशी संपर्क करून संपूर्ण मार्गदर्शन करेल.”
YOJNAVALA GOOGLE FORM LINK - इथे क्लिक करा
Kukutpalan Yojana 2026: महत्त्वाच्या लिंक्स
| अधिकृत वेबसाइट | इथे क्लिक करा |
| शासन निर्णय (GR) | इथे क्लिक करा |
| व्हॉट्सअॅप ग्रुप (अपडेटसाठी) | येथे क्लिक करा |
निष्कर्ष
कुक्कुटपालन हा व्यवसाय कमी जागेत आणि कमी पाण्यात करता येतो. अंडी असो किंवा चिकन मागणी बाराही महिने असते. आणि आता सरकार निम्मा ते पाऊण खर्च उचलायला तयार आहे हे खरंच एक मोठं पाऊल आहे.
खूप जण अशा योजना वाचतात, “नंतर करू” म्हणतात आणि संधी निघून जाते. कागदपत्रे आधीच तयार ठेवा, जवळच्या पशुवैद्यकीय कार्यालयात एकदा जाऊन या आणि अर्ज वेळेत करा. ही संधी आहे ती सोडू नका.
अधिक माहितीसाठी तुम्ही आम्हाला yojnavala@gmail.com या मेल ID वर संपर्क करू शकता.
शासन निर्णय क्रमांक : DAHD-14017/1/2026-AH4, दिनांक 09 मार्च 2026
Kukutpalan Yojana 2026: वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
Kukutpalan Yojana 2026 Maharashtra मध्ये किती अनुदान मिळते?
महाराष्ट्र कुक्कुटपालन योजना 2026 अंतर्गत सर्वसाधारण प्रवर्गासाठी 50 टक्के आणि अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गासाठी 75 टक्के अनुदान मिळते. 5000 अंडी देणाऱ्या पक्षांच्या योजनेत सर्वसाधारण प्रवर्गाला 15,00,000 रुपयांपर्यंत अनुदान मिळू शकते.
Kukutpalan Yojana 2026 साठी अर्ज कुठे करायचा?
कुक्कुटपालन योजना 2026 साठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. आयुक्त पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज उपलब्ध होतात. जवळच्या जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालयातही माहिती मिळते.
Maharashtra Kukutpalan Yojana 2026 साठी कोण पात्र आहे?
महाराष्ट्र कुक्कुटपालन योजना 2026 साठी सर्वसाधारण, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील अत्यल्प भूधारक, अल्प भूधारक, निहक्क धारक, सुशिक्षित बेरोजगार आणि महिला बचत गटातील सदस्य पात्र आहेत..
Kukutpalan Yojana 2026 मध्ये किती पक्षी मिळतात?
या योजनेत 5000 एक दिवशीय अंडी देणारे पक्षी मिळतात. मांसल कुक्कुट योजनेत 3000 ते 5000 पक्षांसाठी शेड व साधनसामुग्री अनुदान मिळते. Incubator योजनेत प्रति आठवडा 1000 अंडी उबवणी क्षमतेचे संयंत्र मिळते.
कुक्कुटपालन योजना 2026 साठी कोणती कागदपत्रे लागतात?
कुक्कुटपालन योजना 2026 साठी 7/12 उतारा किंवा भाडेपट्टा करारनामा, कुक्कुटपालन प्रशिक्षण प्रमाणपत्र किंवा अनुभव प्रमाणपत्र, बँक कर्ज मंजुरी सहमती पत्र, दिव्यांगांसाठी UDID प्रमाणपत्र आणि बचत गट सदस्यत्व प्रमाणपत्र लागते.
Kukutpalan Yojana 2026 अनुदान कसे मिळते?
कुक्कुटपालन योजना 2026 चे अनुदान दोन टप्प्यांत थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यात DBT म्हणजे Direct Benefit Transfer पद्धतीने जमा केले जाते. पहिला टप्पा शेड बांधकाम झाल्यावर आणि दुसरा टप्पा पक्षी व साधनसामुग्री खरेदी केल्यावर मिळतो.
Kukutpalan Yojana 2026 साठी जमीन नसेल तर अर्ज करता येतो का?
हो. Incubator-Hatcher संयंत्र योजनेसाठी जमीन नसलेल्या म्हणजे भूमिहीन लाभार्थ्यांनाही अर्ज करता येतो. अंडी देणारे पक्षी आणि मांसल कुक्कुट योजनांसाठी मात्र किमान 20 गुंठे जमीन किंवा 5 वर्षांचा नोंदणीकृत भाडेपट्टा आवश्यक आहे.
Maharashtra Kukutpalan Anudan Yojana 2026 कधी सुरू झाली?
महाराष्ट्र कुक्कुटपालन अनुदान योजना 2026 दिनांक 09 मार्च 2026 रोजी शासन निर्णय क्रमांक DAHD-14017/1/2026-AH4 अन्वये जाहीर करण्यात आली. मंत्रिमंडळाने 22 फेब्रुवारी 2026 रोजी या योजनेला मंजुरी दिली होती.
कुक्कुटपालन योजना 2026 मध्ये SC-ST प्रवर्गाला किती अनुदान मिळते?
कुक्कुटपालन योजना 2026 मध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांना एकूण प्रकल्प खर्चाच्या 75 टक्के अनुदान मिळते. 5000 पक्षांच्या योजनेत हे अनुदान 22,50,000 रुपयांपर्यंत जाऊ शकते.
Kukutpalan Yojana 2026 मध्ये महिलांसाठी आरक्षण आहे का?
हो. महाराष्ट्र कुक्कुटपालन योजना 2026 मध्ये महिलांसाठी 50 टक्के आरक्षण ठेवण्यात आलेले आहे. दिव्यांगांसाठी 5 टक्के आरक्षण आहे. महिला बचत गटातील सदस्यांनाही या योजनेचा लाभ घेता येतो.
इतर सरकारी योजना