Annasaheb Patil Karj Yojana 2026: मराठा समाजाला ₹50,00,000 पर्यंत बिनव्याजी कर्ज! एजंटशिवाय थेट अर्ज करा, सर्व माहिती इथे बघा

Annasaheb Patil Karj Yojana 2026 या पोस्ट मध्ये आपण मराठा समजातील एखाद्या तरुणाला जर व्यवसाय करायचा असेल तर अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ त्याला कश्या प्रकारे मदत करत हे बघणार आहोत. तर गणेश हा आमच्याच नगर जिल्ह्यातला तरुण. बारावी झाल्यावर त्याला स्वतःचा हार्डवेअरचा व्यवसाय सुरू करायचा होता. भांडवल नव्हतं, आणि बँकेने कर्ज दिलं तरी व्याजाचा EMI परवडणार नव्हता. गावातल्या एका एजंटने त्याला “पैसे भरा, काम होऊन जाईल” असं सांगितलं होतं पण गणेशकडे तेवढेही पैसे नव्हते. शेवटी त्याला कळलं की सरकारची Annasaheb Patil Karj Yojana आहे, जिथे कोणत्याही एजंटला पैसे न देता, बँकेचं कर्ज घेऊन त्यावरचं व्याज सरकार परत करतं.

महाराष्ट्र शासनाने Annasaheb Patil Karj Yojana 2026 अंतर्गत मराठा व कुणबी-मराठा समाजातील तरुणांना व्यवसायासाठी वैयक्तिक कर्जावर ₹15,00,000 पर्यंत, तर गट व्यवसायासाठी ₹50,00,000 पर्यंत कर्ज उपलब्ध करून दिलं आहे आणि त्यावरचं व्याज महामंडळामार्फत थेट बँक खात्यात परत जमा होतं.

Annasaheb Patil Karj Yojana 2026: योजना म्हणजे काय?

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची स्थापना १९९८ मध्ये झाली. महामंडळाचा मुख्य उद्देश आहे मराठा समाजातील आर्थिकदृष्ट्या मागास, सुशिक्षित बेरोजगार तरुणांना स्वयंरोजगार आणि व्यवसायासाठी आर्थिक सहाय्य देणे.

महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या महामंडळ स्वतः थेट कर्ज देत नाही. बँक तुम्हाला व्यवसायासाठी कर्ज मंजूर करते आणि तुम्ही नियमित EMI भरत असाल तर त्या कर्जावरचं व्याज महामंडळ तुमच्या बँक खात्यात परत जमा करतं. म्हणजेच तुमच्यासाठी हे कर्ज effectively बिनव्याजी होतं.

Annasaheb Patil Karj Yojana 2026: या योजनेत नक्की काय मिळतं?

महामंडळामार्फत तीन प्रमुख योजना राबवल्या जातात:

वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना (IR-I)

एका व्यक्तीने स्वतःच्या नावे व्यवसायासाठी घेतलेल्या कर्जासाठी:

  • कर्ज मर्यादा: ₹15,00,000 पर्यंत
  • व्याज परतावा: जास्तीत जास्त ₹4,50,000 पर्यंत
  • कालावधी: जास्तीत जास्त ५ ते ७ वर्ष
  • व्याजदर मर्यादा: जास्तीत जास्त १२% (द.सा.द.शे.)

गट कर्ज व्याज परतावा योजना (IR-II)

दोन किंवा जास्त व्यक्तींनी मिळून सुरू केलेल्या व्यवसायासाठी व्याज परतावा गटाच्या बँक खात्यात दरमहा जमा केला जातो.

गट प्रकल्प कर्ज योजना (GL-I)

  • कर्ज मर्यादा: ₹50,00,000 पर्यंत
  • व्याज परतावा: जास्तीत जास्त ₹3,00,000 पर्यंत
  • एकूण प्रकल्प रकमेच्या १०% रक्कम गटाने स्वतः जमा करणं बंधनकारक
  • सलग ३ महिने हप्ता वेळेत भरल्यास व्याजाची रक्कम एकरकमी गटाच्या खात्यात जमा होते

Annasaheb Patil Karj Yojana 2026: कोणाला मिळते ही योजना?

ही योजना फक्त मराठा आणि कुणबी-मराठा समाजातील उमेदवारांसाठी आहे. इतर जाती किंवा प्रवर्गातील उमेदवारांना या योजनेचा लाभ घेता येत नाही. योजनेचा लाभ फक्त नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा चालू व्यवसाय वाढवण्यासाठी घेतलेल्या कर्जावरच मिळतो घरखरेदी किंवा वैयक्तिक खर्चासाठी घेतलेलं कर्ज या योजनेत पात्र नाही.

Annasaheb Patil Karj Yojana 2026: पात्रता काय आहे?

  • अर्जदार मराठा किंवा कुणबी-मराठा समाजातील असावा
  • वयोमर्यादा: १८ ते ६० वर्षे
  • अर्जदार महाराष्ट्र राज्याचा कायमचा रहिवासी असावा
  • कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न ₹8,00,000 पेक्षा कमी असावं (नॉन-क्रिमिलेयर मर्यादेनुसार, पती-पत्नी दोघांचं एकत्रित सकल उत्पन्न ग्राह्य धरलं जातं निव्वळ उत्पन्न नाही)
  • अर्जदाराने यापूर्वी महामंडळाच्या इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा
  • व्यवसाय / प्रकल्पासाठी बँकेकडून कर्ज मंजूर असणं आवश्यक

Annasaheb Patil Karj Yojana 2026: कागदपत्रे कोणती लागतात?

  • आधार कार्ड (मोबाईल नंबर लिंक असलेलं)
  • उत्पन्नाचा दाखला
  • जात प्रमाणपत्र (मराठा / कुणबी-मराठा)
  • महाराष्ट्र अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate)
  • व्यवसायाचा Project Report
  • बँक कर्ज मंजुरी पत्र (Loan Sanction Letter)
  • बँक पासबुक / खाते तपशील
  • पासपोर्ट साईझ फोटो

Annasaheb Patil Karj Yojana 2026: अनुदान/लाभ कधी आणि कसं मिळतं?

बँकेने कर्ज मंजूर केल्यानंतर आणि अर्जदाराने नियमित EMI भरायला सुरुवात केल्यानंतर, महामंडळ त्या हप्त्यातील व्याजाची रक्कम दरमहा/तिमाही/सहामाही पद्धतीने थेट आधार-लिंक्ड बँक खात्यात जमा करतं. हप्ता वेळेत भरला तरच व्याज परतावा मिळतो हप्ता चुकला तर परतावा थांबतो.

Annasaheb Patil Karj Yojana 2026: महत्त्वाच्या अटी

  • कर्ज फक्त व्यवसाय/उद्योगासाठीच असावं वैयक्तिक खर्च किंवा घरखरेदीसाठी नाही
  • हप्ता वेळेत भरणं बंधनकारक, अन्यथा व्याज परतावा बंद होतो
  • अर्ज करण्यापूर्वी LOI (Letter of Intent) घेणं अनिवार्य आहे
  • योजना मंजूर झाल्यानंतर व्यवसायाच्या फलकावर “अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या सहाय्याने” असा उल्लेख करणं आवश्यक
  • व्यवसाय सुरू झाल्याचा फोटो महामंडळाला पाठवणं आवश्यक

फसवणुकीपासून सावध राहा: कोणीही एजंट किंवा व्यक्ती पैसे मागत असेल तर सावध रहा या योजनेसाठी सरकारकडून कोणतीही अधिकृत फी आकारली जात नाही. कोणालाही OTP, बँक तपशील किंवा ATM Pin शेअर करू नका.

Annasaheb Patil Karj Yojana 2026: अर्ज कुठे आणि कसा करायचा?

अर्ज पूर्णपणे ऑनलाइन आहे udyog.mahaswayam.gov.in या पोर्टलवर, किंवा मोबाईल ऍप्लिकेशन वरून करू शकता.

Step-by-step प्रोसेस:

  1. पोर्टलवर आधार नंबर + OTP ने नोंदणी करा
  2. व्यवसाय तपशील भरून LOI (Letter of Intent) जनरेट करा
  3. वैयक्तिक माहिती, बँक तपशील आणि व्यवसाय प्रस्ताव भरा
  4. आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा
  5. अर्ज तपासून अंतिम स्वरूपात सबमिट करा — अर्ज बँकेकडे पाठवला जातो
  6. बँकेने कर्ज मंजूर केल्यावर नियमित EMI भरा व्याज परतावा सुरू होईल

Annasaheb Patil Karj Yojana 2026: महत्त्वाच्या लिंक्स

अधिकृत पोर्टल (udyog.mahaswayam.gov.in)इथे क्लिक करा
अर्ज करा / नोंदणी कराइथे क्लिक करा
मोबाईल एप्लीकेशन (Android)इथे क्लिक करा

आर्थिक अडचणीमुळे अनेक तरुणांचं व्यवसाय सुरू करण्याचं स्वप्न अपूर्ण राहतं Annasaheb Patil Karj Yojana 2026 ही त्यांच्यासाठी मोठी संधी आहे. जे वेळेत अर्ज करतात तेच या योजनेचा पूर्ण फायदा घेतात. त्यामुळे कागदपत्रे आधीच तयार करा आणि अर्ज करायला मागे-पुढे पाहू नका. अशाच सरकारी योजनांच्या ताज्या बातम्यांसाठी Yojnavala.com ला भेट द्या आणि आमचे Instagram Page फॉलो करा.

Annasaheb Patil Karj Yojana 2026: वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

Annasaheb Patil Karj Yojana 2026 म्हणजे काय?

ही महाराष्ट्र शासनाची योजना आहे, ज्यामध्ये मराठा व कुणबी-मराठा समाजातील तरुणांनी व्यवसायासाठी घेतलेल्या बँक कर्जावरचं व्याज सरकार परत करतं.

Annasaheb Patil Karj Yojana साठी किती कर्ज मिळतं?

वैयक्तिक व्यवसायासाठी ₹15,00,000 पर्यंत, तर गट व्यवसायासाठी ₹50,00,000 पर्यंत कर्ज मिळू शकतं.

Annasaheb Patil Karj Yojana साठी ऑनलाइन अर्ज कसा करायचा?

udyog.mahaswayam.gov.in या पोर्टलवर आधार नंबरने रजिस्टर करून, LOI घेऊन आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करून अर्ज करता येतो.

Annasaheb Patil Karj Yojana साठी कोणती कागदपत्रे लागतात?

आधार कार्ड, उत्पन्नाचा दाखला, जात प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, प्रोजेक्ट रिपोर्ट आणि बँक कर्ज मंजुरी पत्र लागतं.

ही योजना खरंच बिनव्याजी आहे का?

प्रत्यक्षात बँक कर्जावर व्याज आकारते, पण नियमित EMI भरल्यास ते व्याज महामंडळ परत करतं त्यामुळे लाभार्थ्यासाठी ते effectively बिनव्याजी ठरतं.

अर्जासाठी एजंटला पैसे द्यावे लागतात का?

नाही. अर्ज प्रक्रिया पूर्णपणे मोफत आहे, कोणालाही पैसे देण्याची गरज नाही.

उत्पन्न मर्यादा किती आहे?

कुटुंबाचं वार्षिक सकल उत्पन्न ₹8,00,000 पेक्षा कमी असावं.

वयोमर्यादा किती आहे?

१८ ते ६० वर्षे.

घरखरेदीसाठी या योजनेतून कर्ज मिळतं का?

नाही, ही योजना फक्त व्यवसाय/उद्योग सुरू करण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी घेतलेल्या कर्जावरच लागू आहे.

हप्ता चुकला तर व्याज परतावा मिळतो का?

नाही, हप्ता वेळेत भरणं बंधनकारक आहे तसं न झाल्यास व्याज परतावा थांबवला जातो.

इतर सरकारी योजना

Ghar Kul Jaga Kharedi Yojana 2026: घरासाठी जागा खरेदीवर ₹1,00,000 अनुदान, सर्व माहिती इथे बघा

Mahila Shetkari 2026: महिलांना मिळणार शेतकरी प्रमाणपत्र! कर्ज, Subsidy थेट लाभ, सर्व माहिती इथे बघा

NCMC Card 2026: बस सवलतीसाठी हे स्मार्ट कार्ड अनिवार्य! ₹199 मध्ये कसं काढायचं, सर्व माहिती इथे बघा

Lek Ladki Yojana 2026: लेक लाडकी योजनेअंतर्गत मुलींना मिळणार ₹1,01,000! संपूर्ण माहिती व अर्ज प्रक्रिया इथे बघा

Rajmata Jijau Yojna 2026: फक्त ₹1 भाड्याने महिलांना शासकीय जमीन! 5 हेक्टरपर्यंत जमीन मिळणार, सर्व माहिती इथे बघा

Karjmafi Yojana 2026: कर्जमाफीची प्रक्रिया कुठपर्यंत आली? यादी, KYC आणि पैसे कधी येणार, सर्व माहिती इथे बघा

Aai Karj Yojana 2026: महिलांना मिळणार ₹15 लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज! संपूर्ण माहिती व अर्ज प्रक्रिया इथे बघा

Bandhkam Kamgar Yojana 2026: १०वी-१२वीच्या विद्यार्थ्यांना दरवर्षी ₹१०,००० पर्यंत मदत! संपूर्ण माहिती व अर्ज प्रक्रिया इथे बघा

MahaID 2026: महासारथी पोर्टलवर MahaID कसा काढायचा? संपूर्ण माहिती व अर्ज प्रक्रिया इथे बघा

Sarkari Yojana Portal 2026: एकाच ठिकाणी 2000 पेक्षा जास्त सरकारी योजना! योग्य योजना कशी शोधायची, सर्व माहिती इथे बघा

Ladki Bahin Yojana Status 2026: जवळपास 68 लाख बहिणींची नावं यादीतून बाद, तुमचं नाव अजून आहे का? असं 2 मिनिटांत बघा

Senior Citizen Card 2026: ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्रामुळे , प्राधान्याने उपचार आणि पेन्शन! संपूर्ण माहिती व अर्ज प्रक्रिया इथे बघा

Business Loan Yojana 2026: व्यवसाय सुरू करण्यासाठी 3 जबरदस्त योजना! ₹50 लाखांपर्यंत कर्ज आणि 35% पर्यंत अनुदान, सर्व माहिती इथे बघा

Shetkari Karjmafi 2026: कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंनी थेट तारीख जाहीर केली! ८ ते १० दिवसांत होणार कर्जमाफी, सर्व माहिती इथे बघा

Honda Unicorn vs Hero Splendor Plus 2026: कोणती बाईक खरंच परवडते? किंमत, मायलेज, EMI आणि 5 वर्षांचा खर्च, इथे बघा

Gramin Pashudhan Udyojakta Yojna 2026: महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाइन अर्ज कधी सुरू होणार? संपूर्ण माहिती इथे बघा

CMYKPY 2026: मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत तरुणांना दरमहा ₹10,000 रुपये पर्यंत स्टायपेंड! 12वी ते PG पास पर्यंत विद्यार्थ्याना संधी, लगेच इथून अर्ज करा

Leave a Comment