MahaID 2026 या पोस्ट मध्ये आपण महाराष्ट्र सरकारने नुकतेच सांगितलं की आता इथून पुढे सरकारी योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर MahaID नंबर हा लागणार आहे आणि आपण हा नंबर तुम्ही ऑनलाइन घरी बसल्या कसा काढू शकता हेच या पोस्ट मध्ये बघणार आहोत, तर रमेश काका दर वेळी सरकारी योजनेचा अर्ज भरायला गेले की तेच रडगाणं आधार कार्ड काढ, रेशन कार्ड काढ, उत्पन्नाचा दाखला काढ, जातीचा दाखला काढ. एका योजनेसाठी जमवलेली कागदपत्रं दुसऱ्या योजनेला परत जमवायची. प्रत्येक वेळी तोच फॉर्म, तीच धावपळ. “एकदाच सगळी माहिती कुठेतरी साठवली असती तर किती बरं झालं असतं,” असं ते नेहमी म्हणायचे.
आता काकांची हीच इच्छा सरकारने पूर्ण केली आहे. 24 जून 2026 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महासारथी (MahaSarathi) हे एकात्मिक डिजिटल व्यासपीठ आणि MahaID ही प्रत्येक नागरिकाची एकमेव डिजिटल ओळख अधिकृतपणे सुरू केली. हा एकच क्रमांक तुमच्या आधार कार्डशी जोडलेला असेल आणि यातच तुमची सगळी माहिती सुरक्षितपणे साठवली जाईल.
पण MahaID नक्की काय आहे, तो कोणाला लागतो, आणि सगळ्यात महत्त्वाचं MahaID कसा काढायचा हे नीट समजून घेणं गरजेचं आहे. तेच आज आपण स्टेप बाय स्टेप बघणार आहोत.
MahaID 2026: MahaID म्हणजे काय?
MahaID ही महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकासाठी तयार केलेली एकमेव डिजिटल ओळख (Unique Digital Identity) आहे. हा एक क्रमांक तुमच्या आधार कार्डशी लिंक असतो आणि यामध्ये तुमचं वय, उत्पन्न, जात, पत्ता, शिक्षण अशी सगळी महत्त्वाची माहिती एकाच ठिकाणी सुरक्षितपणे साठवलेली असते.
सोप्या भाषेत सांगायचं तर जसं तुमचं आधार कार्ड ही तुमची ओळख आहे, तसंच MahaID ही महाराष्ट्र शासनाच्या सेवा व योजनांसाठीची तुमची एकमेव ओळख आहे. एकदा MahaID तयार झाला की वेगवेगळ्या योजनांसाठी पुन्हा पुन्हा तीच माहिती आणि कागदपत्रं द्यायची गरज राहात नाही.
MahaID 2026: महासारथी पोर्टल म्हणजे काय?
महासारथी (MahaSarathi) हे महाराष्ट्र शासनाचं एकात्मिक डिजिटल व्यासपीठ आहे. राज्यातील प्रत्येक नागरिकाशी संबंधित महत्त्वाची माहिती हे पोर्टल सुरक्षितपणे एकत्र करतं आणि त्यावरूनच तुमचा MahaID तयार होतो.
राज्याच्या वेगवेगळ्या सेवा आता हळूहळू एकाच platform वर म्हणजेच महासारथी आणि नवीन MahaDBT 2.0 पोर्टलवर आणल्या जात आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात राज्याच्या नवीन योजनांचा अर्ज करताना MahaID ही पायरी महत्त्वाची ठरणार आहे.
अधिकृत वेबसाइट: mahasarathi.maharashtra.gov.in
MahaID 2026: MahaID चे फायदे काय?
MahaID 2026 मुळे सामान्य नागरिकाला नक्की काय फायदा होतो ते बघूया:
एकदाच माहिती, पुन्हा पुन्हा फॉर्म नाही
एकदा MahaID तयार झाला की वेगवेगळ्या विभागांसाठी वारंवार अर्ज भरण्याची किंवा तीच कागदपत्रं पुन्हा पुन्हा सादर करण्याची गरज राहात नाही. तुमची माहिती आपोआप भरली जाते.
सगळी माहिती सुरक्षित आणि एकाच ठिकाणी
तुमची पडताळलेली (verified) माहिती एकाच ठिकाणी सुरक्षित, विश्वसनीय आणि अद्ययावत स्वरूपात उपलब्ध असते.
जलद आणि पारदर्शक प्रक्रिया
सेवा व योजनांचा लाभ घेण्याची प्रक्रिया अधिक सोपी, जलद आणि पारदर्शक होते म्हणजे कमी वेळ, कमी कागदपत्रं आणि अधिक सुविधा.
DigiLocker शी जोडणी
MahaID / महासारथी आता DigiLocker शीही जोडला गेला आहे. त्यामुळे जवळपास 14 कोटी महाराष्ट्रवासी आपली ही ओळख कुठेही, कधीही डिजिटल स्वरूपात access आणि share करू शकतात.
MahaID 2026: MahaID कोणाला लागतो?
महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकासाठी MahaID उपयुक्त आहे. विशेषतः खालील लोकांनी तो आधीच काढून ठेवणं फायद्याचं ठरेल:
- ज्यांना यापुढे राज्य सरकारच्या नवीन योजनांचा अर्ज करायचा आहे.
- विद्यार्थी, ज्यांना MahaDBT 2.0 पोर्टलवरून शिष्यवृत्ती (scholarship) साठी अर्ज करायचा आहे.
- ज्यांना सरकारी दाखले, सेवा आणि योजनांचा लाभ एकाच ठिकाणाहून घ्यायचा आहे.
महत्त्वाची सूचना: MahaID हा प्रामुख्याने राज्य सरकारच्या सेवा व नवीन योजनांसाठी वापरला जातो. PM Kisan सारख्या केंद्र सरकारच्या योजना त्यांच्या स्वतःच्या (Aadhaar-based) पद्धतीनेच चालू राहतात. तसंच लाडकी बहीणसारख्या चालू योजनेचे लाभ हे त्या योजनेच्या स्वतःच्या eKYC प्रक्रियेवर अवलंबून असतात. त्यामुळे “MahaID नाही म्हणून आत्ता मिळणारे पैसे बंद होतील” अशा अफवांवर विश्वास ठेवू नका.
MahaID 2026: MahaID काढण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात?
MahaID 2026 काढण्याची प्रक्रिया मुख्यतः आधारवर आधारित (Aadhaar-based) असल्यामुळे फार कागदपत्रांची गरज नसते. साधारणपणे लागणाऱ्या गोष्टी:
- आधार कार्ड (Aadhaar number)
- आधारशी लिंक असलेला मोबाईल नंबर (OTP साठी आवश्यक)
- स्वतःचा ईमेल आयडी (काही ठिकाणी verification साठी)
- आधार-लिंक केलेलं बँक खातं (DBT लाभांसाठी उपयुक्त)
MahaID 2026: MahaID कसा काढायचा? (संपूर्ण अर्ज प्रक्रिया)
खाली MahaID काढण्याच्या दोन पद्धती दिल्या आहेत. तुम्हाला जी सोपी वाटेल ती वापरा.
पद्धत 1: महासारथी / MahaDBT 2.0 पोर्टलवरून (नवीन वापरकर्त्यांसाठी)
स्टेप 1: सर्वात आधी अधिकृत वेबसाइट mahasarathi.maharashtra.gov.in किंवा mahadbt2.maharashtra.gov.in वर जा.
स्टेप 2: उजव्या वरच्या कोपऱ्यातून आपली भाषा निवडा मराठी किंवा English.
स्टेप 3: पहिल्यांदा वापरत असाल तर “Register” या बटणावर क्लिक करा
स्टेप 4: आता आपला आधार नंबर टाका आणि OTP हा पर्याय निवडून “Send OTP” वर क्लिक करा.
स्टेप 5: आधारशी लिंक असलेल्या मोबाईलवर आलेला OTP टाका आणि verify करा.
स्टेप 6: OTP verify झाल्यावर तुमची आधारमधील माहिती (नाव, पत्ता वगैरे) स्क्रीनवर दिसेल. ती तपासून घ्या.
स्टेप 7: आता स्वतःचं username आणि password तयार करा आणि “Save” वर क्लिक करा. इथेच तुमचा MahaID तयार होतो.
पद्धत 2: DigiLocker वरून (आधीच Family ID असेल किंवा नवीन काढायचा असेल)
स्टेप 1: DigiLocker अॅप उघडा किंवा digilocker.gov.in वर जाऊन sign in करा.
स्टेप 2: “Issued Documents” मध्ये जा किंवा “Mahasarathi / Family ID Maharashtra” असं search करा.
स्टेप 3: आवश्यक माहिती भरा आणि consent (संमती) द्या.
स्टेप 4: “Fetch” वर क्लिक करा तुमचा Mahasarathi (Family ID) लगेच तयार होऊन DigiLocker मध्ये सुरक्षित साठवला जाईल.
MahaID 2026: महत्त्वाच्या गोष्टी या पासून सावध राहा
फसवणुकीपासून सावध राहा: कोणी फोन करून OTP मागितल्यास देऊ नका. सरकार कधीही फोनवर OTP मागत नाही.
कोणत्याही एजंटला पैसे देऊ नका: MahaID काढणं पूर्णपणे मोफत आहे. यासाठी कोणालाही पैसे देऊ नका.
बँक खात्याची माहिती शेअर करू नका: आपला खाते क्रमांक, IFSC किंवा ATM Pin कोणालाही सांगू नका.
फक्त अधिकृत वेबसाइट वापरा: MahaID फक्त mahasarathi.maharashtra.gov.in किंवा अधिकृत DigiLocker वरूनच काढा. इतर बनावट (fake) वेबसाइटवर माहिती भरू नका.
MahaID 2026: महत्त्वाच्या लिंक्स
| अधिकृत वेबसाइट (महासारथी) | इथे क्लिक करा |
| MahaDBT 2.0 पोर्टल | इथे क्लिक करा |
| DigiLocker | इथे क्लिक करा |
MahaID ही येणाऱ्या काळातली तुमची सगळ्यात महत्त्वाची डिजिटल ओळख ठरणार आहे. राज्याच्या नवीन योजनांचा अर्ज सोपा आणि जलद व्हावा यासाठी आजच आपला MahaID काढून ठेवा कारण जे वेळेत तयारी करतात, तेच पुढे धावपळ टाळतात. अशाच सरकारी योजनांच्या ताज्या बातम्यांसाठी Yojnavala.com ला भेट द्या आणि आमचे Instagram Page फॉलो करा.
MahaID 2026: वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
MahaID म्हणजे काय?
MahaID ही महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकासाठीची एकमेव डिजिटल ओळख आहे, जी आधार कार्डशी लिंक असते. यामध्ये तुमचं वय, उत्पन्न, जात, पत्ता अशी माहिती एकाच ठिकाणी साठवली जाते आणि शासनाच्या सेवा व योजनांसाठी ती वापरली जाते.
MahaID 2026 कधी सुरू झाला?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 24 जून 2026 रोजी महासारथी पोर्टल आणि MahaID अधिकृतपणे सुरू केला.
MahaID कसा काढायचा?
MahaID तुम्ही mahasarathi.maharashtra.gov.in या अधिकृत पोर्टलवर जाऊन आधार नंबर व OTP द्वारे registration करून काढू शकता. याशिवाय DigiLocker वरूनही Mahasarathi (Family ID) मिळवता येतो.
MahaID काढण्यासाठी पैसे लागतात का?
नाही. MahaID काढणं पूर्णपणे मोफत आहे. यासाठी कोणत्याही एजंटला किंवा व्यक्तीला पैसे देऊ नका.
MahaID काढण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात?
मुख्यतः आधार कार्ड, आधारशी लिंक असलेला मोबाईल नंबर आणि (काही ठिकाणी) ईमेल आयडी लागतो. प्रक्रिया आधारवर आधारित असल्यामुळे जास्त कागदपत्रांची गरज नसते.
MahaID नसेल तर लाडकी बहीणचे पैसे बंद होतील का?
नाही. लाडकी बहीण योजनेचे लाभ हे त्या योजनेच्या स्वतःच्या Aadhaar-based eKYC प्रक्रियेवर अवलंबून असतात, MahaID वर नाही. त्यामुळे अशा अफवांवर विश्वास ठेवू नका.
MahaID चा PM Kisan शी संबंध आहे का?
PM Kisan ही केंद्र सरकारची योजना आहे आणि ती pmkisan.gov.in वरून आधारच्या आधारेच चालते. MahaID ही राज्य सरकारची ओळख असल्यामुळे तिचा PM Kisan साठी थेट वापर होत नाही.
इतर सरकारी योजना
नमस्कार! मी अनिकेत, Yojnavala.com चा संस्थापक. अहिल्यानगर जिल्ह्यातून असलेला एक डिजिटल कंटेंट क्रिएटर. गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रातील शेतकरी, महिला आणि सामान्य नागरिकांपर्यंत सरकारी योजनांची माहिती सोप्या मराठी भाषेत पोहोचवण्याचे काम करतो. @yojnavala Instagram वर १ लाखाहून अधिक मराठी वाचक माझ्यासोबत जोडलेले आहेत.