Gai Gotha Yojana 2026 या पोस्ट मध्ये आपण सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजगता योजना 2026 यात गाई गोठा साठी किती अनुदान दिलेले आहेत तसच या योजनेसाठी लागणारे कागदपत्रे तसच योजनेसाठी अर्ज कसा करायचं हे बघणार आहोत.
गावाकडे अनेक शेतकरी आहेत ज्यांच्याकडे एक-दोन गाई आहेत. दूध विकतात, घरखर्च भागवतात. पण मोठा व्यवसाय करायचा म्हटलं तर पाच-सहा गायी लागतात, शेड बांधायला पैसे लागतात, दुधाचं यंत्र घ्यायला भांडवल लागतं. हे सगळं एकट्याने उभं करणं सोपं नाही.
पण आता सरकार या शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहिलं आहे.
महाराष्ट्र शासनाने मार्च 2026 मध्ये एक महत्त्वाचा शासन निर्णय जाहीर केला आहे. मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेअंतर्गत Gai Gotha Yojana 2026 मध्ये थेट 50 ते 75 टक्क्यांपर्यंत अनुदान दिलं जाणार आहे. म्हणजे शेड बांधा, गाई यंत्रसामुग्री घ्या आणि खर्चाचा निम्मा ते पाऊण हिस्सा सरकार देणार. SC-ST प्रवर्गाला तर 75 टक्क्यांपर्यंत मदत मिळते.
या योजनेत नक्की काय आहे, कोणाला मिळते, किती पैसे मिळतात आणि अर्ज कसा करायचा हे सगळं आज आपण सविस्तर बघणार आहोत.
आपल्याला व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम, टेलिग्राम, फेसबूक आणि यूट्यूबवर अजूनपर्यंत Follow आणि Subscribe केल नसेल तर लगेच करून घ्या योजनेच्या लेटेस्ट अपडेटच्या व्हिडिओसाठी.
Gai Gotha Yojana 2026 म्हणजे काय?
महाराष्ट्र शासनाचं “विकसित महाराष्ट्र 2047” हे मोठं उद्दिष्ट आहे. राज्याची अर्थव्यवस्था 5 ट्रिलियन डॉलरपर्यंत न्यायची आहे. आणि हे साध्य व्हायचं असेल तर फक्त शहरं नाही तर ग्रामीण भागही मजबूत व्हायला हवा. शेतीला जोड म्हणून पशुपालन, दुग्धव्यवसाय हे सर्वात विश्वासार्ह पर्याय आहेत.
याच विचारातून कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाने दिनांक 09 मार्च 2026 रोजी शासन निर्णय क्रमांक DAHD-14017/1/2026-AH4 जारी केला. मंत्रिमंडळाने 22 फेब्रुवारी 2026 रोजी मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेला मंजुरी दिली होती.
या योजनेत गाय आणि म्हैस पालनाच्या व्यवसायासाठी स्वतंत्र घटक आहे. याला आपण Gai Gotha Yojana 2026 म्हणून ओळखतो. या अंतर्गत 5 दुधाळ गायी किंवा म्हशींचा गट, शेड आणि सर्व यंत्रसामुग्रीसह पूर्ण प्रकल्प उभारण्यासाठी अनुदान मिळतं.
Gai Gotha Yojana 2026 मध्ये नक्की काय मिळतं?
हा प्रश्न सगळ्यांना पहिला पडतो योजनेत मिळतं काय नक्की?
या योजनेत लाभार्थ्याला खालील गोष्टी मिळतात:
५ दुधाळ गायी किंवा म्हशी – HF, Jersey किंवा गीर, साहिवाल यासारख्या उच्च उत्पादन देणाऱ्या जाती. यासोबत 3 वर्षांचा विमा देखील असतो.
शेड बांधकाम – ३ लाख रुपयांपर्यंत शेड बांधण्यासाठी मदत मिळते.
साधनसामुग्री – कडबाकुट्टी यंत्र, फॉगिंग मशीन, मिल्किंग मशीन, दूध कॅन, फवारणी यंत्र, सोलर ३kW यंत्रणा आणि इतर आवश्यक साहित्य.
थोडक्यात — गोठा उभारण्यापासून ते दूध काढण्याच्या यंत्रापर्यंत सगळ्या गोष्टींसाठी सरकार मदत करतं.
Gai Gotha Yojana 2026 – प्रकल्प खर्च किती आणि अनुदान किती?
एकूण प्रकल्प खर्च
| घटक | रक्कम |
|---|---|
| ५ गायी/म्हशी (प्रति जनावर ₹१ लाख) | ₹५,००,०००/- |
| ३ वर्षांचा विमा | ₹५,६०,१८०/- |
| शेड बांधकाम | ₹३,००,०००/- |
| साधनसामुग्री (यंत्रे, सोलर इ.) | ₹२,७५,०००/- |
| एकूण प्रकल्प किंमत | ₹११,३५,१८०/- |
अनुदान किती मिळतं?
| प्रवर्ग | अनुदान | रक्कम |
|---|---|---|
| सर्वसाधारण | ५०% | ₹५,६७,५९०/- |
| अनुसूचित जाती / जमाती | ७५% | ₹८,५१,३८५/- |
हे अनुदान थेट बँक खात्यात DBT पद्धतीने जमा होतं दोन टप्प्यांत. पहिला टप्पा शेड बांधकाम आणि साधनसामुग्री खरेदी केल्यानंतर, आणि दुसरा टप्पा जनावरे खरेदी केल्यानंतर मिळतो.
Gai Gotha Yojana 2026 पात्रता काय आहे?
जमीन
किमान १ एकर स्वतःची जमीन किंवा किमान ५ वर्षांचा नोंदणीकृत भाडेपट्टा असणं आवश्यक आहे. निहक्क धारकांना मात्र जमिनीची ही अट लागू नाही.
अनुभव किंवा प्रशिक्षण
शासकीय किंवा निमशासकीय संस्थेचं पशुपालन / दुग्धव्यवसाय प्रशिक्षण प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. प्रमाणपत्र नसेल तर २ वर्षांचा दुग्धव्यवसायाचा अनुभव चालतो. अर्ज करताना प्रमाणपत्र नसेल तर हमीपत्र देऊनही अर्ज करता येतो अनुदान घेण्यापूर्वी प्रशिक्षण घ्यावं लागेल.
लाभार्थी प्राधान्यक्रम
या योजनेत लाभार्थी निवडताना खालील क्रमाने प्राधान्य दिलं जातं:
अ) अत्यल्प भूधारक (१ हेक्टरपर्यंत जमीन असणारे) सर्वात आधी संधी
ब) अल्प भूधारक (१ ते २ हेक्टर जमीन)
क) निहक्क धारक
ड) महिला बचत गटातील लाभार्थी
याशिवाय दिव्यांगांसाठी ५ टक्के आणि महिलांसाठी ३० टक्के आरक्षण लागू आहे.
ही योजना मुंबई आणि मुंबई उपनगर वगळता महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांत लागू आहे. एका कुटुंबातून फक्त एकालाच लाभ मिळेल.
Gai Gotha Yojana 2026 कोणत्या गायी मिळतात?
योजनेत वाटप होणाऱ्या जनावरांबद्दल थोडं नक्की समजून घ्या:
दूध उत्पादनानुसार जाती
HF / Jersey संकरित गाई– दररोज १०-१४ लिटर दूध उत्पादन देतात. सर्वाधिक उत्पादन देणाऱ्या जाती.
गीर, साहिवाल, रेड कंधारी, राठी, थारपारकर – दररोज ८-१० लिटर दूध देतात. या देशी सुधारित जाती आहेत.
स्थानिक प्रजाती गाई/म्हशी – दररोज ५-७ लिटर दूध देतात.
जनावरांबद्दल महत्त्वाची अट
वाटप करण्यात येणाऱ्या जनावरांचं १-२ महिन्यांपूर्वी दुसरं किंवा तिसरं वेत असावं. म्हणजे व्यवसाय सुरू होताच दूध उत्पादन लगेच मिळेल.
Gai Gotha Yojana 2026 साठी कागदपत्रे कोणती लागतात?
कागदपत्रांची यादी फार मोठी नाही. खाली नक्की काय लागतं ते बघा:
जमिनीसाठी: स्वतःच्या नावे ७/१२ उतारा किंवा किमान ५ वर्षांचा नोंदणीकृत भाडेपट्टा करारनामा. निहक्क धारकांसाठी ७/१२ उताऱ्यावर “इतर अधिकार” नोंद किंवा जिल्हाधिकाऱ्यांकडून प्राप्त अनुसूची “ज” प्रमाणपत्र.
अनुभव/प्रशिक्षणासाठी: पशुपालन दुग्धव्यवसायाचं शासकीय/निमशासकीय प्रशिक्षण प्रमाणपत्र. किंवा स्थानिक पशुवैद्यकीय अधिकाऱ्याचं २ वर्षांचं अनुभव प्रमाणपत्र. किंवा दूध संस्थेस किमान २ वर्षे दूध विक्री करत असल्याचं प्रमाणपत्र.
इतर: दिव्यांगांसाठी UDID प्रमाणपत्र. महिला बचत गटाचं सदस्यत्व प्रमाणपत्र. आणि बेसिक KYC कागदपत्रे.
महत्त्वाच्या अटी – अर्ज करण्यापूर्वी एकदा नक्की वाचा
जनावरे खरेदी करताना शक्यतो पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी व शेळी विकास महामंडळाच्या प्रक्षेत्रावरून घेणं अपेक्षित आहे. तेथे उपलब्ध नसल्यास खाजगी बाजारातूनही घेता येतात.
निवड झाल्यानंतर एका महिन्याच्या आत शेड बांधकाम आणि साधनसामुग्री खरेदी पूर्ण करावी लागते. त्याच कालावधीत जनावरांची खरेदीही करायची असते.
जनावरे मेल्यास विम्याच्या पैशातून नवीन जनावर खरेदी करावं लागतं.
जर मागील ३ वर्षांत केंद्र किंवा राज्याच्या अशाच एखाद्या योजनेचा लाभ घेतला असेल तर ही योजना मिळणार नाही.
सरकारी अनुदानाचा गैरवापर केल्यास अनुदान व्याजासह परत करावं लागेल आणि पुढील ५ वर्षांसाठी कोणत्याही योजनेचा लाभ मिळणार नाही.
Gai Gotha Yojana 2026 अर्ज कसा करायचा?
या योजनेसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. आयुक्त पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय, महाराष्ट्र राज्य, पुणे हे दरवर्षी आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस ऑनलाईन अर्ज मागवतात.
सर्व अर्जांची छाननी होऊन यादृच्छिक म्हणजे Lottery पद्धतीने लाभार्थ्यांची निवड होते. निवड झालेल्यांची यादी आयुक्त पशुसंवर्धन यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाते.
सध्या अर्जाची नक्की तारीख जाहीर झालेली नसेल तर आपल्या जिल्ह्यातील जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालयात जाऊन चौकशी करणं हा सर्वात सोपा मार्ग आहे. साधारणपणे एप्रिल-मे 2026 मध्ये अर्ज सुरू होण्याची शक्यता आहे.
Yojnavala टीम कडून मार्गदर्शन मिळवा.
“खाली दिलेला Google फॉर्म भरा – आमची टीम 24 ते 48 तासांत तुमच्याशी संपर्क करून संपूर्ण मार्गदर्शन करेल.”
YOJNAVALA GOOGLE FORM LINK - इथे क्लिक करा
Gai Gotha Yojana 2026 महत्त्वाच्या लिंक्स
| अधिकृत वेबसाइट | इथे क्लिक करा |
| शासन निर्णय (GR) | इथे क्लिक करा |
| व्हॉट्सअॅप ग्रुप (अपडेटसाठी) | येथे क्लिक करा |
निष्कर्ष
गाई-म्हैस पालनाचा व्यवसाय ग्रामीण भागात नेहमीच विश्वासाचा आहे. दुधाला मागणी बाराही महिने असते. आणि आता सरकार निम्मा ते पाऊण खर्च उचलायला तयार आहे हे खरंच एक मोठं पाऊल आहे.
खूप जण अशा योजना वाचतात, “नंतर करू” म्हणतात आणि संधी निघून जाते. ७/१२ उतारा, अनुभव दाखला किंवा प्रशिक्षण प्रमाणपत्र ही कागदपत्रे आधीच तयार ठेवा. जवळच्या पशुवैद्यकीय कार्यालयात एकदा जाऊन या. अर्ज वेळेत करा. ही संधी सोडू नका.
अधिक माहितीसाठी तुम्ही आम्हाला yojnavala@gmail.com या मेल ID वर संपर्क करू शकता.
शासन निर्णय क्रमांक: DAHD-14017/1/2026-AH4, दिनांक 09 मार्च 2026
Gai Gotha Yojana 2026 वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
Gai Gotha Yojana 2026 मध्ये किती अनुदान मिळतं?
सर्वसाधारण प्रवर्गासाठी एकूण प्रकल्प खर्चाच्या ५०% म्हणजे सुमारे ₹५,६७,५९०/- अनुदान मिळतं. अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गासाठी ७५% म्हणजे ₹८,५१,३८५/- पर्यंत अनुदान मिळतं. हे अनुदान थेट बँक खात्यात DBT पद्धतीने दोन टप्प्यांत जमा होतं.
Gai Gotha Yojana 2026 साठी जमीन किती असणं आवश्यक आहे?
किमान १ एकर स्वतःची जमीन असणं आवश्यक आहे. स्वतःची जमीन नसेल तर किमान ५ वर्षांचा नोंदणीकृत भाडेपट्टा असेल तरी चालतो. निहक्क धारकांना जमिनीची ही अट अजिबात लागू नाही.
या योजनेसाठी अनुभव नसेल तर अर्ज करता येतो का?
हो, करता येतो. प्रशिक्षण प्रमाणपत्र किंवा २ वर्षांचा अनुभव नसेल तर अर्ज करताना हमीपत्र द्यावं लागतं. अनुदान घेण्यापूर्वी शासकीय किंवा निमशासकीय संस्थेचं प्रशिक्षण पूर्ण केलं तरी चालतं.
Gai Gotha Yojana मध्ये एकूण प्रकल्प किती रुपयांचा असतो?
या योजनेतील एकूण प्रकल्प किंमत ₹११,३५,१८०/- आहे. यात ५ दुधाळ जनावरे, ३ वर्षांचा विमा, शेड बांधकाम आणि मिल्किंग मशीन, सोलर यंत्रणा यासह सर्व साधनसामुग्रीचा समावेश आहे.
Gai Gotha Yojana 2026 साठी अर्ज कुठे आणि कसा करायचा?
या योजनेसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. आयुक्त पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या अधिकृत पोर्टलवर आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस अर्ज मागवले जातात. अर्जाची तारीख जाहीर झाली की जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालयातूनही माहिती मिळते.
या योजनेत कोणत्या जातीच्या गायी मिळतात?
योजनेत HF व Jersey संकरित गायी (दररोज १०-१४ लिटर), गीर, साहिवाल, राठी, थारपारकर यासारख्या देशी सुधारित जाती (दररोज ८-१० लिटर) आणि स्थानिक प्रजातीच्या गायी/म्हशी (दररोज ५-७ लिटर) मिळतात. जनावरे १-२ महिन्यांपूर्वी व्यालेली आणि दुसऱ्या किंवा तिसऱ्या वेतातील असावीत अशी अट आहे.
एका कुटुंबातील किती जणांना या योजनेचा लाभ मिळतो?
एका कुटुंबातून फक्त एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ मिळतो. तसेच मागील ३ वर्षांत केंद्र किंवा राज्य शासनाच्या अशाच दुसऱ्या कोणत्याही पशुपालन योजनेचा लाभ घेतला असेल तर या योजनेसाठी अपात्र ठरता येतं.
Gai Gotha Yojana 2026 ही योजना कोणत्या जिल्ह्यांसाठी लागू आहे?
ही योजना मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्हा वगळता महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांसाठी लागू आहे. म्हणजे पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर यांसह सर्व ग्रामीण जिल्ह्यांतील शेतकरी पात्र आहेत.
अनुदान कधी आणि कसं मिळतं?
अनुदान दोन टप्प्यांत मिळतं. पहिला ५०% हप्ता शेड बांधकाम आणि साधनसामुग्री खरेदी केल्यानंतर मिळतो. उर्वरित ५०% जनावरांची खरेदी झाल्यावर थेट DBT म्हणजे Direct Bank Transfer पद्धतीने लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा होतो.
योजनेत निवड कशी होते अर्ज केला की लगेच लाभ मिळतो का?
नाही, लगेच लाभ मिळत नाही. सर्व अर्जांची छाननी झाल्यानंतर यादृच्छिक म्हणजे Random Lottery पद्धतीने पात्र लाभार्थ्यांची निवड केली जाते. निवड झालेल्यांची यादी आयुक्त पशुसंवर्धन यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाते. निवड न झाल्यास प्रतीक्षा यादीत नाव ठेवलं जातं आणि पुढील वर्षी प्राधान्याने विचार केला जातो.
इतर सरकारी योजना