Shelipalan Yojana 2026: मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेअंतर्गत शेळीपालनसाठी 75% अनुदान! 8,53,915 रुपये अनुदान, सर्व माहिती इथे बघा

Shelipalan Yojana 2026 या योजेबद्दल सविस्तर माहिती आपण यामध्ये बघणार आहोत.

आमच्या गावात नगरजवळ एक शेतकरी आहेत किशोर काका. गेल्या कित्येक वर्षांपासून ते शेळीपालन करायचं स्वप्न बघत होते. पण सुरुवातीचा खर्च जड वाटायचा म्हणून राहूनच जायचं. मग यावर्षी मार्चमध्ये त्यांनी बातमी ऐकली सरकारने नवीन योजना आणली आहे, शेळीपालनासाठी थेट 50% अनुदान मिळणार. काका म्हणाले, मला पण शेळीपालण करायचय पण कस करायच त्यांना exactly माहिती नव्हत.

तुम्हीही किशोर काकांसारखाच विचार करत असाल तर ही माहिती नक्की वाचा.

महाराष्ट्र शासनाने 2026 मध्ये मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना जाहीर केली आहे. या योजनेत शेळी-मेंढी पालनासाठी तब्बल 50% पेक्षा जास्त सरकारी अनुदान मिळतं. म्हणजे तुम्ही अर्धा खर्च करा, बाकी सरकार देतं. आणि SC/ST प्रवर्गासाठी तर 75% पर्यंत अनुदान आहे.

पण योजना नक्की काय आहे, कोणाला मिळते, अर्ज कसा करायचा हे सगळं नीट समजून घेणं गरजेचं आहे. तेच आज आपण बघणार आहोत.

आपल्याला व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम, टेलिग्राम, फेसबूक आणि यूट्यूबवर अजूनपर्यंत Follow आणि Subscribe केल नसेल तर लगेच करून घ्या योजनेच्या लेटेस्ट अपडेटच्या व्हिडिओसाठी.

Shelipalan Yojana 2026: मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना म्हणजे काय?

थोडक्यात सांगायचं तर सरकारला माहीत आहे की शेतकऱ्यांचं उत्पन्न फक्त शेतीवर अवलंबून ठेवणं धोकादायक आहे. पाऊस बुडाला की सगळंच बुडतं. म्हणूनच “विकसित महाराष्ट्र 2047” या कार्यक्रमाअंतर्गत शेतीला जोड म्हणून पशुपालन व्यवसाय मजबूत करायचा निर्णय झाला.

कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाने दिनांक 09 मार्च 2026 रोजी हा शासन निर्णय जारी केला. मंत्रिमंडळाने 22 फेब्रुवारी 2026 रोजी या योजनेला मंजुरी दिली.

या योजनेत फक्त शेळ्या-मेंढ्या मिळत नाहीत. शेड बांधायला पैसे, साधनसामुग्री, विमा एकत्रित प्रकल्प म्हणून संपूर्ण मदत होते. हे वेगळेपण समजून घ्यायला हवं.

Shelipalan Yojana 2026: या योजनेत नक्की काय मिळतं?

बऱ्याच लोकांच म्हणण अस असत की सरकारी योजना असतात ज्यात लिहिलेलं खूप आणि प्रत्यक्षात मिळतं थोडंच. पण या योजनेत मात्र प्रकल्पाची संपूर्ण रचनाच आखलेली आहे.

50+5 शेळी किंवा मेंढी गट मिळतो म्हणजे 50 शेळ्या किंवा मेंढ्या आणि 5 बोकड किंवा मेंढे. यासोबत 3 वर्षांचा विमा, शेड बांधकाम आणि कडबाकुट्टी यंत्र, सोलर यंत्रणा यासारखी साधने देखील मिळते.

या प्रकल्पाची एकूण किंमत किती?

पशुधन खरेदीसाठी प्रति शेळी किंवा मेंढी 12,000 रुपये आणि प्रति बोकड किंवा मेंढा 15,000 रुपये याप्रमाणे 50+5 गटाची किंमत 6,75,000 रुपये होते.

3 वर्षांच्या विम्यासाठी 1,01,554 रुपये, शेड बांधकामासाठी 2,00,000 रुपये, कडबा कुट्टी यंत्रासाठी 30,000 रुपये आणि 3 kW सोलरसाठी 1,02,000 रुपये मिळून एकूण प्रकल्पाची किंमत 11,38,554 रुपये होते.

किती अनुदान मिळतं?

सर्वसाधारण प्रवर्गासाठी 50 टक्के म्हणजे 5,69,277 रुपये आणि अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गासाठी म्हणजेच SC/ST साठी 75 टक्के म्हणजे 8,53,915 रुपये अनुदान मिळतं. हे अनुदान थेट बँक खात्यात DBT पद्धतीने येतं कुठल्या दलालाची गरज नाही.

Shelipalan Yojana 2026: कोणाला मिळते ही योजना?

हे जरा नीट वाचा कारण इथेच बहुतेक लोक confuse होतात.

सर्वसाधारण, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती या तिन्ही प्रवर्गातील लोकांना ही योजना लागू आहे. मात्र निवडीचा प्राधान्यक्रम ठरलेला आहे.

Shelipalan Yojana 2026 निवडीचा प्राधान्यक्रम

सगळ्यात आधी संधी मिळते अत्यल्प भूधारकांना म्हणजे ज्यांच्याकडे कमी जमीन म्हणजेच 1 हेक्टरपर्यंत जमीन आहे. त्यानंतर अल्प भूधारक म्हणजे 1 ते 2 हेक्टरपर्यंत जमीन असणारे. मग निहक्क धारक आणि शेवटी महिला बचत गटातील लाभार्थी.

दिव्यांगांसाठी 5 टक्के आणि महिलांसाठी 30 टक्के आरक्षण आहे. ही योजना मुंबई आणि मुंबई उपनगर वगळता उर्वरित सर्व जिल्ह्यांत लागू आहे.

एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे एका कुटुंबातून फक्त एकालाच लाभ मिळेल. आणि जर मागील 3 वर्षांत केंद्र किंवा राज्याच्या अशाच दुसऱ्या कुठल्या योजनेचा लाभ घेतला असेल, तर या योजनेसाठी अपात्र ठरण्याची शक्यता आहे.

Shelipalan Yojana 2026: पात्रता काय आहे?

यासाठी दोनच मुख्य अटी आहेत एक म्हणजे जमीन नावावर लागते आणि दुसर अनुभव.

जमिनीबद्दल बोलायचं तर किमान 1 एकर स्वतःची जमीन किंवा 5 वर्षांचा नोंदणीकृत भाडेपट्टा लागतो. निहक्क धारकांना मात्र ही अट नाही.

अनुभव किंवा प्रशिक्षणाबद्दल म्हणाल तर शेळी-मेंढी पालनाचा किमान 2 वर्षांचा अनुभव असावा. अनुभव नसेल तर शासकीय किंवा निमशासकीय संस्थेचं प्रशिक्षण प्रमाणपत्र चालतं. अर्ज करताना प्रमाणपत्र नसेल तरी चालेल अनुदान घेण्यापूर्वी प्रशिक्षण घेण्याचं हमीपत्र द्यावं लागतं.

Shelipalan Yojana 2026: कागदपत्रे कोणती लागतात?

यादी फार मोठी नाही. खालील कागदपत्रे तयार ठेवा:

7/12 उतारा किंवा 5 वर्षांचा नोंदणीकृत भाडेपट्टा करारनामा लागतो.

निहक्क जमीन असेल तर 7/12 उताऱ्यावरील “इतर अधिकार” नोंद किंवा जिल्हाधिकाऱ्यांचं अनुसूची “जे” प्रमाणपत्र द्यावं लागतं.

पशुपालन प्रशिक्षण प्रमाणपत्र किंवा स्थानिक पशुवैद्यकीय अधिकाऱ्याचं 2 वर्षांचं अनुभव प्रमाणपत्र आवश्यक आहे.

दिव्यांग असाल तर UDID प्रमाणपत्र आणि बचत गटाच्या सदस्य असाल तर सदस्यत्व प्रमाणपत्र लागतं.

Shelipalan Yojana 2026: अनुदान कधी आणि कसं मिळतं?

अमुदण हे दोन टप्प्यांत मिळतं.

पहिला टप्पा म्हणजे शेड बांधकाम आणि साधनसामुग्री खरेदी झाल्यानंतर एकूण अनुदानाच्या 50 टक्के रक्कम बँकेत येते.

दुसरा टप्पा म्हणजे प्रत्यक्ष शेळी-मेंढी गट खरेदी केल्यानंतर उरलेले 50 टक्के मिळतात. दोन्ही वेळा DBT म्हणजे थेट बँक खात्यात.

Shelipalan Yojana 2026: महत्त्वाच्या अटी

शेळ्या-मेंढ्यांची खरेदी प्रथम पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी व शेळी विकास महामंडळाकडून करायची असते. तिथे उपलब्ध नसतील तर ना-उपलब्धता प्रमाणपत्र घेऊन खाजगी ब्रीडिंग फार्म किंवा खुल्या बाजारातून खरेदी करता येते.

खरेदी करायच्या जनावरांचं वय 1 ते 3 वर्षांदरम्यान असणं आवश्यक आहे. निवड झाल्यानंतर एकाच महिन्यात शेड, साधनसामुग्री आणि जनावरे खरेदी पूर्ण करावी लागते. वेळ चुकवला तर नाव प्रतीक्षा यादीत शेवटी जातं हे लक्षात ठेवा.

पशुधनाचा विमा लाभार्थी आणि जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांच्या संयुक्त नावाने 3 वर्षांसाठी काढणं बंधनकारक आहे. एखादं जनावर दगावलं तर विम्याच्या रकमेतून दुसरं घेता येतं. सर्व जनावरांची नोंद भारत पशुधन पोर्टलवर करणं अनिवार्य आहे.

Shelipalan Yojana 2026: अर्ज कुठे आणि कसा करायचा?

लाभार्थी निवड ऑनलाईन पद्धतीने होते. आयुक्त पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय, महाराष्ट्र राज्य, पुणे हे दरवर्षी आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला अर्ज मागवतात. प्राप्त झालेल्या अर्जांची ऑनलाईन छाननी होऊन यादृच्छिक पद्धतीने निवड केली जाते.

निवड यादी आयुक्त पशुसंवर्धन यांच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर होते. आपल्या जिल्ह्यातील जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालयात जाऊन अधिक माहिती आणि अर्जाची प्रक्रिया जाणून घेता येते.

Yojnavala टीम कडून मार्गदर्शन मिळवा.

“खाली दिलेला Google फॉर्म भरा – आमची टीम 24 ते 48 तासांत तुमच्याशी संपर्क करून संपूर्ण मार्गदर्शन करेल.”

Shelipalan Yojana 2026: महत्त्वाच्या लिंक्स

अधिकृत वेबसाइटइथे क्लिक करा
शासन निर्णय (GR)इथे क्लिक करा
व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप (अपडेटसाठी)येथे क्लिक करा

निष्कर्ष

खूप लोक अशा योजना “वाचतात” आणि “नंतर करू” म्हणत सोडून देतात. पण जे वेळेत अर्ज करतात तेच या योजनेचा फायदा घेतात.

किशोर काकांसारख्या लोकांनी हीच संधी वापरून व्यवसाय उभा करणार आहे. तुमच्याकडे जमीन आहे, इच्छा आहे आता फक्त एक पाऊल टाकायचं आहे.

कागदपत्रे तयार करा, जवळच्या पशुवैद्यकीय कार्यालयात चौकशी करा आणि अर्ज करायला मागे-पुढे पाहू नका. ही संधी आहे ती सोडू नका. अधिक माहितीसाठी आमच्यासोबत अपडेटेड रहा.

Shelipalan Yojana 2026: वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना 2026 म्हणजे काय?

महाराष्ट्र शासनाने 9 मार्च 2026 रोजी जाहीर केलेली ही योजना शेतकऱ्यांना शेळी-मेंढी पालनासाठी 50% ते 75% अनुदान देते. शेळ्या, शेड बांधकाम, विमा आणि साधनसामुग्री यांसाठी एकत्रित मदत मिळते.

शेळीपालन योजना 2026 मध्ये किती अनुदान मिळतं?

सर्वसाधारण प्रवर्गासाठी 50% म्हणजे अंदाजे 5,69,277 रुपये आणि SC/ST प्रवर्गासाठी 75% म्हणजे 8,53,915 रुपये अनुदान मिळतं. हे अनुदान DBT पद्धतीने थेट बँक खात्यात जमा होतं.

Shelipalan Yojana 2026 साठी ऑनलाइन अर्ज कसा करायचा?

आयुक्त पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या अधिकृत संकेतस्थळावर दरवर्षी अर्ज मागवले जातात. ऑनलाइन छाननी होऊन यादृच्छिक पद्धतीने लाभार्थी निवड केली जाते. अधिक माहितीसाठी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालयात संपर्क करावा.

शेळीपालन योजनेसाठी कोणती कागदपत्रे लागतात?

7/12 उतारा किंवा 5 वर्षांचा नोंदणीकृत भाडेपट्टा करारनामा, पशुपालन प्रशिक्षण प्रमाणपत्र किंवा 2 वर्षांचं अनुभव प्रमाणपत्र लागतं. दिव्यांगांसाठी UDID प्रमाणपत्र आणि बचत गट सदस्यांसाठी सदस्यत्व प्रमाणपत्र आवश्यक आहे.

जमीन नसेल तर शेळीपालन योजनेचा लाभ मिळेल का?

निहक्क धारकांना जमिनीची अट नाही. इतरांसाठी किमान 1 एकर स्वतःची जमीन किंवा 5 वर्षांचा नोंदणीकृत भाडेपट्टा आवश्यक आहे.

शेळीपालन योजनेसाठी प्रशिक्षण बंधनकारक आहे का?

किमान 2 वर्षांचा अनुभव किंवा शासकीय प्रशिक्षण प्रमाणपत्र लागतं. अर्ज करताना नसेल तरी चालतं, पण अनुदान घेण्यापूर्वी प्रशिक्षण घेण्याचं हमीपत्र द्यावं लागतं.

शेळीपालन योजनेत शेड बांधकामासाठी पण पैसे मिळतात का?

हो, शेड बांधकामासाठी 2,00,000 रुपये, कडबाकुट्टी यंत्रासाठी 30,000 रुपये आणि 3 kW सोलर यंत्रणेसाठी 1,02,000 रुपये मिळतात. हे सगळं एकत्रित प्रकल्प म्हणून दिलं जातं.

Shelipalan Yojana 2026 अनुदान कधी मिळतं?

अनुदान दोन टप्प्यांत मिळतं. शेड बांधकाम व साधनसामुग्री खरेदीनंतर 50% आणि प्रत्यक्ष शेळी-मेंढी गट खरेदी केल्यानंतर उरलेले 50% थेट बँक खात्यात DBT पद्धतीने जमा होतात.

Shelipalan Yojana 2026 कोणत्या जिल्ह्यांत लागू आहे?

मुंबई आणि मुंबई उपनगर वगळता महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांत ही योजना लागू आहे.

एका कुटुंबातून किती जणांना शेळीपालन योजनेचा लाभ मिळतो?

एका कुटुंबातून फक्त एकालाच या योजनेचा लाभ मिळतो. तसेच मागील 3 वर्षांत केंद्र किंवा राज्याच्या अशाच दुसऱ्या कुठल्या योजनेचा लाभ घेतला असेल तर अपात्र ठरण्याची शक्यता आहे.

इतर सरकारी योजना

Ladki Bahin Yojana eKYC: eKYC कशी करावी? योजनेचे या महिन्याचे पैसे कधी येणार? लगेच इथून बघा

Kukutpalan Yojana 2026: कुकुटपालनासाठी महाराष्ट्र शासनाकडून ७५% अनुदान! २२,५०,००० रूपये अनुदान, GR व अर्ज कसा करायचा, लगेच इथून बघा

Shetkari Karmafi Yojana 2026: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना २०२६! पात्रता, अपात्रता तसेच अर्जाची प्रोसेस, लगेच इथे बघा

Divyang Toolkit Yojana 2026: दिव्यांग व्यक्तींना स्व-रोजगारासाठी ₹15,000 आर्थिक सहाय्य! संपूर्ण माहिती व अर्ज प्रक्रिया, लगेच इथून फॉर्म डाऊनलोड करा

Mukhyamantri Tirthadarshan Yojna 2026: 139 तीर्थस्थळांची यादी, ₹30,000 मदत, पात्रता आणि अर्ज प्रक्रिया, GR व फॉर्म इथे बघा

LIC Vima Sakhi Yojana 2026: महिलांसाठी रोजगाराची मोठी संधी, पात्रता, फायदे, अर्ज प्रक्रिया संपूर्ण माहिती, लगेच इथून अर्ज करा

Leave a Comment